पालिकेच्या पथकावर झोपडीधारकांची दगडफेक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या पथकावर झोपडीधारकांची दगडफेक

Share This
मुंबई - विद्यविहार येथे सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील झोपड्या हटवण्यास गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर स्थानिक नागरिकांनी मंगळवारी (ता. 1) दगडफेक केली; मात्र पोलिसांनी तत्काळ जमावाला पांगवल्यानंतर 125 झोपड्या तोडण्यात आल्या. 
विद्याविहार पश्‍चिम येथील रामदेव पिर मार्गावर 172 झोपड्या आहेत. त्या हटवून हा रस्ता थेट सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्याला जोडण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या "एन‘ विभाग कार्यालयाने येथील 92 झोपड्यांवर कारवाई केली होती; मात्र कारवाई केल्यानंतर घरांचे पत्रे जप्त न केल्यामुळे रहिवाशांनी पुन्हा झोपड्या उभारल्या. याच झोपड्या पाडण्यासाठी पालिकेचे पथक गेले असता रहिवाशांनी दगडफेक करून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी जमावाला पांगवले. त्यानंतर कचऱ्याला आग लावण्याचा प्रकारही रहिवाशांनी केला. अग्निशमन दलाने ही आग आटोक्‍यात आणली. त्यानंतर 125 झोपड्या पाडण्यात आल्या. उद्या उर्वरित झोपड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. हा रस्ता थेट सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्याला जोडण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर त्याचा फायदा घाटकोपर, विद्याविहार पश्‍चिमेकडील वाहनांना होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages