राणेंचा सोमवारी राजीनामा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राणेंचा सोमवारी राजीनामा

Share This
लोकसभा निवडणुकीतील काँगेसच्या दारूण पराभवानंतरही राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून पृथ्वीराज चव्हाण यांना हटविले जात नसल्याने अखेर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा बंड पुकारले आहे. दोन दिवस कोकणचा दौरा करून आल्यानंतर सोमवारी दुपारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे राणेंनी गुरुवारी जाहीर केले असून, आपली पुढील राजकीय भूमिकाही राणे त्याचवेळी जाहीर करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत राणे यांचे चिरंजीव डॉ. नीलेश राणे यांचा सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात पराभव झाला. या पराभवास राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरच काँगेसचे नेतेही जबाबदार असल्याचा आरोप करत राणेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता; परंतु तेव्हा काँगेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली होती. तसेच, लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचे संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात चव्हाण यांनाच मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्यात आले. त्यामुळे आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचाच, असा चंग राणे यांनी बांधला आहे. तशी घोषणा त्यांनी गुरुवारी केली

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages