बृहन्मुंबईत गेल्या पांच दिवसांपासून पाऊस सुरु आहे. पावसाळ्या पूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाय योजनांमुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवनमान सुरळीत सुरु असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी आपत्ती नियंत्रण कक्षास आज (दिनांक १५.०७.२०१४) भेट दिल्यानंतर केले.
बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने हा पावसाळा मुंबईकरांसाठी सुखद व्हावा म्हणून रस्ते व नालेसफाईसह अन्य पावसाळापूर्वीची सर्व कामे समाधानकारक केलेली आहेत, यामुळे सतत ५ ते ६ दिवस शहरात पाऊस सुरुअसूनही महापालिका प्रशासनानेमुंबईकरांना आज कोणताही त्रास होत नाही, याबद्दल महापौर सुनिल प्रभु यांनी आज समाधान व्यक्त केले. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास भेट दिल्यानंतर त्यांनी शहरात विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे रस्ते, वाहतूक व समुद्र भरतीची पाहणी महापौरांनी केली. यावेळी नियंत्रण कक्षाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी माहिती दिली.
