नागपंचमीला जिवंत नाग नको - हायकोर्ट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नागपंचमीला जिवंत नाग नको - हायकोर्ट

Share This
मुंबई : बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला नाग पूजेकरता जिवंत नाग वापरण्यास परवानगी द्यावी अशी याचिका बत्तीसशिराळा ग्रामपंचयातीनं मुंबई उच्च न्यायालयात केली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळण्यात आली आहे. 
नाग पूजेसाठी जिवंत नागाची गरज नसून, नाग प्रतिमेची पूजा करावी असे आदेश न्यायालयानं दिलेत. त्याचबरोबर नागपंचमीला पूजेसाठी जिवंत नाग वापरल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश ही न्यायालयानं दिले आहेत. 

हिंदू धर्मानुसार नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. नागपंचमीला बत्तीस शिराळा येथे मोठा उत्सव असतो. हज़ारो नाग या दिवशी बत्तीस शिराळा येथे पूजेसाठी आणले जातात. त्यावर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी उठवावी आणि नागपंचमीला पूजेसाठी जिवंत नाग वापरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका बत्तीश शिराळा ग्रामपंचयातीनं केली होती. ती याचिका फेटाळत नागपंचमीला पूजेसाठी जिवंत नाग वापसी नये असे आदेश न्यायालयानं दिलेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages