मु्ंबई महापालिकेच्या केईएम रूग्णालयाचा दिल्लीच्या एम्सच्या धर्तीवर विकास करण्यात यावा त्यासाठी केद्र शासकानाडून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी खासदार राहूल शेवळे यांनी केंद्रीय आरोग्य मंञी डॉ हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे.
मुंबई महापालिकेचे केईएम रूग्णालय हे मुंबईसह महाराष्ट्राच्या आणि संपुर्ण देशभ्रातून येणारया लाखो गोरगरीब रूग्णांना आरोग्य सेवा देत आहे. ८७ वर्ष रुग्ण सेवेत असणाऱया या हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेजही असल्यामुळे चांगले डॉक्टर तयार करण्यासोबतच हे रूग्णलय लाखो रुग्यांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देते आहे. १८०० खाटांच्या या रूग्णालयात १८ लाख रुग्ण वर्षाला उपचार घेतात तर ६० हजार विविध शस्ञक्रिया होतात. उत्तम रुग्णसेवा देणाऱया या रूग्णालयाला आतापर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
केईएम रूग्णालयात संपुर्ण देशभरातून लाखो रूग्ण येत असल्यामुळे इथल्या यंञणेव प्रचंड ताण पडतो आहे. त्यामुळे या रूगणालयासाठी निधी उपलब्ध करून येथील सेवा व सुविधांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र शासनाने स्वतंञ निधी उपलब्ध करून देवा व दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर या रूग्णालयाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी राहूल शेवाळे यांनी आपल्या पञात केली आहे. शेवाळे यांनी दिल्लीत डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर करून ही मागणी केली.
