आरजी भूखंडावरील अतिक्रमणावर कारवाही करण्यास पालिकेची टाळाटाळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2014

आरजी भूखंडावरील अतिक्रमणावर कारवाही करण्यास पालिकेची टाळाटाळ

मुंबई / अजेयकुमार जाधव http://jpnnews.webs.com
मुंबई भायखळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील माधव वाडी येथे कच्छी ईशा ओसवाल स्थानकवासी जैन महासंघाने क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केले आहे. या बांधकामाची तक्रार करूनही पालिका अधिकाऱ्यांना म्यानेज केले गेल्याने बेकायदेशीर असलेल्या बांधकामावर गेल्या दीड वर्षामध्ये कारवाही करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती महेश उर्फ बाळा वेंगुर्लेकर यांनी दिली आहे. 
भायखळा आंबेडकर रोड वर ओल्टास कंपनी समोर माधव वाडी आहे. या माधव वाडीमध्ये ईशा ओसवाल स्थानकवासी जैन महासंघाने क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भूखंडावर दुरुस्तीच्या नावावर २२ बाय २५ फुटांचा अनधिकृत वातानुकुलीत हॉल बांधला आहे. नपु शाळेच्या मागील बाजूस २५ बाय २५ चे अनधिकृत स्वयंपाक घर बांधण्यात आले आहे. नपु शाळेकडे जाणारा मार्ग भिंती घालून बंद करण्यात आला असून शाळेतील मुलांना ये जा करण्यासाठी महाजनवाडी चाळीतील दोन दुकाने विनापरवाना तोडून रस्ता बनवण्यात आला आहे. हा भूखंड क्रीडांगणासाठी राखीव असताना या भूखंडावरील सर्व हिरवळ नष्ट करून त्या ठिकाणी लाद्या लावण्यात आल्या आहेत. 

काही वर्षापूर्वी या भूखंडावर नपु शाळेतील तसेच या विभागातील मुले खेळायची आता गेल्या काही वर्षामध्ये ईशा ओसवाल स्थानकवासी जैन महासंघाने अतिक्रमण करून कब्जा केल्याने शाळेतील मुलांना खेळायला मैदानच उरलेले नाही. क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भूखंडावर अतिक्रमण झाल्याने हे अतिक्रमण त्वरित हटवावे अशी मागणी गेले दीड वर्षे महेश वेंगुर्लेकर यांनी मुंबई महानगर पालिकाचे आयुक्त, उप आयुक्त परिमंडळ १, सहाय्यक आयुक्त ई विभाग , पालिकेच्या विविध विभागाकडे तसेच लोकायुक्त यांच्याकडे करत आहेत. परंतू पालिकेच्या सबंधित अधिकाऱ्यांना जैन महासंघाने म्यानेज केल्याने अद्याप कार्वाहीच केली जात अनास्ल्याचे माहिती वेंगुर्लेकर यांनी दिली आहे. दरम्यान याबाबत पालिकेच्या ई विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कबरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही. 

सोबत फोटो 
१ शाळेसाठीचा जुना रस्ता 
२ नव्याने दुकाने तोडून बनवण्यात आलेला रस्ता 
Displaying IMG_20140629_143657.jpgDisplaying IMG_20140629_143639.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS