मुंबईमध्ये ३ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईमध्ये ३ जणांचा मृत्यू

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव / http://jpnnews.webs.com
मुंबईमध्ये पडत असलेल्या पावसा दरम्यान दोन ठिकाणी झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून प्राप्त झाली आहे. 
मुंबईमध्ये सतत पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे मध्यरात्री १२ वाजता जयभीम नगर शिवडी येथे लकी मेन्शन इमारतीच्या पहिल्या मजल्याची भिंत व आरसीसी स्ल्याब इमारती खालून खालून जाणाऱ्या लोकांवर कोसळला. यामध्ये दयाशंकर मिश्रा (६०), रुद्रमनी उपाध्याय (४५) या दोघांना रुग्णालयात नेत्यांना मृत्यू झाला आहे. तर त्रिभुवनदास उपाध्याय (५८) यांच्या उजव्या पायाला व डोक्याला मार लागला आहे त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

कुलाबा येथील गणेशमूर्ती नगर, गल्ली नंबर ३ येथे तळ मजला अधिक एक मजल्याचे बांधकाम सुरु असताना लाद्या कोसळून ६ जण जखमी झाली. यामध्ये मासारुफ शेख (१८) याचा मृत्यू झाला असून शौरत अली (१८), युसुफ शेख (३९), सुदीप हजारे (२९), महमद कलाम (४५), मिनारुल शेख (३३) हे पाच जन जखमी झाले आहेत. जखमींवर सेंट जॉर्ज रुगणालयात उपचार सुरु आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages