सॅण्डहस्र्ट रोड स्थानकाजवळील थोरात इमारत पाडण्यासाठी मेगाब्लॉक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सॅण्डहस्र्ट रोड स्थानकाजवळील थोरात इमारत पाडण्यासाठी मेगाब्लॉक

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव / http://jpnnews.webs.com
मध्य रेल्वेच्या सॅण्डहस्र्ट रोड स्थानकाजवळील थोरात इमारत पाडण्यासाठी शनिवार (१२ जुलै) रात्री ११ ते रविवार (१३जुलै) सकाळी ७ वाजे पर्यंत मध्यरेल्वेने मेगाब्लॉक घेण्याचा विचार केला आहे. मध्य रेल्वे प्रमाणेच हार्बर मार्गावरील लोकलही रात्री ११.३० ते सकाळी ३.३० या दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. 
मध्य रेल्वेच्या सॅण्डहस्र्ट रोड स्थानकाजवळील थोरात इमारतीचा १५ फुटी भिंतीचा काही भाग रेल्वे रुळावंर कोसळल्याने मध्य रेल्वेची सेवा गुरुवारी आणि शुक्रवारी अशा दोन्ही दिवस विस्कळीत झाली होती. मध्य व हार्बर मार्गावरील लोकल बंद ठेवल्याने सुमारे १०० लोकल फेर्‍या रद्द करण्यात येणार आहेत. इमारत पडण्यासाठी मध्य रेल्वेवर रात्री मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याने रविवारी मुलुंड आणि माटुंगा दरम्यान घेण्यात येणारा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला ते सीएसटी, वडाळा दरम्यान सकाळी ११.३० ते दुपारी ३. ३० पर्यंत असलेला मेगा ब्लॉक मात्र रद्द करण्यात आलेला नाही अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages