धरणात ५ दिवसात महिन्याभराचा पाणीसाठ जमा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धरणात ५ दिवसात महिन्याभराचा पाणीसाठ जमा

Share This
मुंबईला पाणी पुरवाठा करणार्या सहा तलावा मध्ये गेल्या ५ दिवसापासून समाधान कारक पाऊस पडतोय. त्यामुळे या तलावांमध्ये महिनाभर पुरेल पाणीसाठा जमा झाला आहे. 

१४ जुलैला तलावामध्ये ९६९९२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता. हा पाणीसाठा फक्त २६ दिवस पुरेल इतकाच होता. गेल्या ५ दिवसात तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. १९ जुलैला तलावांमध्ये २०१०७२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाल्याची नोंद झाली. मुंबईला हा पाणी पुरवठा ५४ दिवस पुरेल इतका आहे. यामुळे गेल्या ५ दिवसात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तलावांमध्ये महिन्याभराच्या पावसाची नोंद झाली आहे.  
तलावांची पातळी  / दशलक्ष लिटर ( १९/०७/२०१४)
मोडक सागर        ७२६३७ 
तानसा                २२३०० 
विहार                  ८३५६
भातसा                ७५११८
मध्य वैतरणा        १६२७८
__________________________________
एकूण                २०१०७२     दशलक्ष लिटर

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages