अग्निशमन अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Share This
अंधेरी (पश्चिम ) येथील लोटस पार्क इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अग्निशमन बहुजन कर्मचारी संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे. 
या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचा एक जवान मृत्यूमुखी पडला तर २१ कर्मचारी जखमी झाले.  या इमारतीला आग लागली तेव्हा इमारतीमधील फायर फायटिंग यंत्रणा कार्यरत नव्हती , यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत  होते.  आग विझवताना अग्नीशमन यंत्रणाच बंद पडल्याने  इमारतीमध्ये अग्निशमन जवान व अधिकारी अडकून पडले . यामध्येच नितीन भागुराम इवलेकर या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोणत्याही इमारतीचे बांधकाम सुरु करण्या आगोदर विविध प्रकारचे ना हरकत प्रमाण पत्रे  मिळवावी लागतात . त्यामध्ये अग्नीशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र खूप महत्वाचे असते . 

फायर फायटिंग यंत्रणा बसवल्याशिवाय ना हरकत प्रमाणपत्र देता येत नाही . लोटस इमारतीचे सुद्धा फायर ऑडिट केलेले नव्हते . त्यामुळे इवलेकर यांच्यावर असा प्रसंग ओढवला आणि  त्यामुळे इवलेकर यांचा मृत्यू झाला . याला संपूर्णता संबंधित अग्निशमन अधिकारी असल्याने अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अग्निशमन बहुजन कर्मचारी संघाचे  सरचिटणीस संजय कांबळे - बापरेकर यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे  केली आहे .  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages