राणे समर्थक रवींद्र फाटक नगरसेवकांसह शिवसेनेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2014

राणे समर्थक रवींद्र फाटक नगरसेवकांसह शिवसेनेत

कट्टर नारायण राणे समर्थक काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र फाटक यांनी आपल्या सहा समर्थ नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. हा राणेंना मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे. फाटक यांनी मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रवेश केला. 

रवींद्र फाटक, जयश्री फाटक, कांचन चिंदरकर, राजा गवारी, मिनल संख्ये आणि दीपक वेसकर यांनी ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी फाटक आणि नगरसेवकांचे स्वागत केले. 

राणेंचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक यांना सेनेत प्रवेश देण्याचे संकेत मिळाले होते. यासाठी आमदार एकनाथ शिंदे यांनी यासाठी महत्वाची भूमिका बजावली. फाटक सेनेत दाखल झाल्याने ६५-६५ असा ठाणे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांचा आकडा आता सेनेच्या बाजुने वाढणार आहे. त्यामुळे ठाणे पालिकेत सेनेची सत्ता येण्याची शक्यता आहे. सात नगरसेवाकांमुळे सेनेचे पालिकेतील संख्याबळ वाढले आहे.

राणे समर्थक रवींद्र फाटक नगरसेवकांसह शिवसेनेत

Post Bottom Ad

JPN NEWS