महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बेस्टच्या त्वरिता मोहिमेची सुरुवात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बेस्टच्या त्वरिता मोहिमेची सुरुवात

Share This
मुंबई शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करणार्‍या महिला या सुरक्षित नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. अक्षरा आणि हिंदुस्थान टाइम्सच्या सर्व्हेनुसार मुंबईकरांची सेकंड लाईफलाइन असणार्‍या बेस्टने प्रवास करणार्‍या ४६ टक्के महिलांना लैंगिक छळास सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी बेस्ट उपक्रमाने त्वरिता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमची सुरुवात येत्या सोमवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्टच्या बसेसमधून प्रवास करणार्‍या महिलांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये बेस्टच्या बसमधून प्रवास करणार्‍या महिलांपैकी सुमारे ४६ टक्के महिलांना लैंगिक छळाचा त्रास सहन करावा लागतो. बसमध्ये महिलांसोबत गैरप्रकार घडल्यास किंवा कोणी करताना आढळून आल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यासाठी बेस्टच्या वाहक आणि चालकाने सतर्क असणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून बेस्ट उपक्रमातील बसवाहकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. बसवाहकांमध्ये जागृती करण्याकरिता बेस्ट उपक्रम आणि अक्षरा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बेस्ट बसगाड्यांमधून महिलांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्वरिता मोहिमेची सुरुवात करण्यात येत आहे. या मोहिमेचे उद््घाटन येत्या सोमवारी ७ जुलै रोजी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, अध्यक्ष-संस्थापक-स्त्री आधार केंद्र आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे मुंबईत बेस्टच्या बसने प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages