इंदू मिल संदर्भात आठवले यांची वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांशी चर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

इंदू मिल संदर्भात आठवले यांची वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांशी चर्चा

Share This
मुंबई येथील इंदू मिलची जागा महाराष्ट्र राज्य सरकारकडे हस्तांतरीत करावी, व महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याकडे केली. 

या महत्वाच्या प्रश्नाबाबत आठवले यांनी आज संसदेत वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी मुंबई येथील इंदू मिलच्या जागा हस्तांतरणविषयी चर्चा केली.याबाबतचा निर्णय मनमोहनसिंग पंतप्रधान असताना घेण्यात आला होता व त्याची कार्यवाही सुरू होती. मात्र आता केंद्रात नव्याने आलेल्या सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन जमीन हस्तांतरणाचा विषय मार्गी लावावा, व बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकर उभारावे, अशी मागणी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages