महाराष्ट्र सदन विषयात काँग्रेसचे राजकारण – आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्र सदन विषयात काँग्रेसचे राजकारण – आठवले

Share This
महाराष्ट्र सदनात असणाऱ्या गैरसोयीबाबत शिवसेनेच्या नेत्यांनी आवाज उठविला. मात्र काँग्रेसवाले याविषयात राजकारण आणत असल्याची प्रतिक्रिया रिप्ब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली. 
दिल्ली येथे असणाऱ्या महाराष्ट्र सदनात निकृष्ट जेवण, पाणी आदी गैरसोयी आढळून आल्या आहेत. याबाबत शिवसेना नेत्यांनी तेथील प्रशासनाला जाब विचारला आहे. गेले काही दिवस हा प्रश्न गाजत असूनदेखील महाराष्ट्र सदनातील होणाऱ्या गैरसोयीबाबत लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी तेथे ठिय्या आंदोलन केले. याबाबत काँग्रेस मात्र याचे राजकारण करीत असून विनाकरण दोन विशिष्ट समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणात कोणतेही राजकारण न आणता येथील महाराष्ट्र सदनातील गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages