म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींचे होणार सर्वेक्षण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींचे होणार सर्वेक्षण

Share This
म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांतर्गत येणार्‍या उपकर प्राप्त इमारतींची माहिती मंडळाकडे नसल्याने अखेर दुरुस्ती मंडळाने या इमारतींची सविस्तर माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेण्याचे ठरवले आहे. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती मंडळांतर्गत १४ हजार ५00 उपकर प्राप्त इमारतींचा समावेश आहे. 
मंडळाची स्थापना झाल्यापासून या इमारतींचे एकूण भूखंड, क्षेत्रफळ, इमारतीतील रहिवाशांची एकूण संख्या, त्यांच्या घराचे क्षेत्रफळ, इमारतींच्या मालकांची नावे, त्या घरांच्या बांधकामांची माहिती, गेल्या ५0 वर्षांत इमारतींमध्ये केल्या गेलेल्या लहान मोठय़ा दुरुस्त्या, रहिवाशांची नावे, इमारतीचे अचुक ठिकाण, धोकादायक इमारतीतून संक्रमित झालेले रहिवासी, संक्रमण शिबिरे, पुनर्विकास झालेल्या इमारती, अशा विविध प्रकारची माहिती म्हाडाकडे अद्यापी उपलब्ध नाही. दोन दिवसांपूर्वी ताडदेव येथे भिंत कोसळलेल्या गणेश सदन या इमारतीची माहिती म्हाडाकडे नाही. तीन वर्षांपूर्वी त्या इमारतीला पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली होती, मात्र विकासकाकडून या इमारतीचे कोणतेही काम झालेले नाही. याबाबतची माहितीही म्हाडाकडे उपलब्ध नव्हती. 

त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्यावर म्हाडाकडून संभ्रमाची कारवाई होते. ती यापुढे होऊ नये आणि इमारतींच्या पुनर्विकासाबाबत किंवा दुरुस्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेता यावेत म्हणून म्हाडाकडून उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणामुळे बांधकामांबाबतची माहिती तर मिळेलच शिवाय म्हाडाअंतर्गत कामासाठी भेटाभेट तयार होऊन एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे. या सर्वेक्षणामुळे संक्रमण शिबिरातील घुसखोरांवर चाप बसणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages