गझदरबंदवरून श्रेयाचे राजकारण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2014

गझदरबंदवरून श्रेयाचे राजकारण

मुंबई - ब्रिमस्ट्रोवॅडअंतर्गत महापालिकेतर्फे गझदरबंद येथे बांधणात येणाऱ्या उदंचन केंद्राच्या भूमिपूजनाच्याच दिवशी श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या प्रयत्नांतून हे पम्पिंग स्टेशन उभारले जात असल्याचा दावा केला जात असताना कॉंग्रेसनेही या पम्पिंग स्टेशनसाठी पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. 
ब्रिमस्ट्रोवॅडअंतर्गत महापालिका 131 कोटी रुपये खर्च करून उदंचन केंद्र उभारणार आहे. या केंद्राचे भूमिपूजन आज झाले. पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी राज्य सरकारच्या अनेक विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी युतीने पाठपुरावा केला असल्याचा दावा केला जात होता. आतापर्यंत पालिकेने केलेल्या मोठ्या प्रकल्पांचे श्रेय युतीलाच मिळाले आहे. निवडणुकांच्या तोंडावर तशा जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत; मात्र या वेळी पहिल्यांदाच कॉंग्रेसच्या आमदाराने युतीच्या या दाव्याला आव्हान दिले आहे. 

अंधेरी पश्‍चिम येथील कॉंग्रेसचे आमदार अशोक जाधव यांनी युतीच्या या दाव्याला थेट आव्हान दिले आहे. या उदंचन केंद्राला परवानगी मिळावी म्हणून महापालिका अधिकाऱ्यांबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपण बैठक घेऊन पाठपुरावा केला होता. त्यामुळे युतीकडून श्रेय लाटण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशीष शेलार यांनीही या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला असल्याचा दावा केला. तशा प्रकारचे संदेश त्यांच्या कार्यालयातून पाठविण्यात आले आहेत. ऍड. शेलार यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने हे पम्पिंग स्टेशन होत असल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS