महापौरांच्या मर्जीतील शिक्षकांच्या बदल्यांमुळे तीव्र असंतोष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापौरांच्या मर्जीतील शिक्षकांच्या बदल्यांमुळे तीव्र असंतोष

Share This

मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांबाबत टाळाटाळ करणार्‍या शिक्षणाधिकार्‍यांनी महापौरांनी सुचवलेल्या शिक्षकांच्या पगारासह बदल्या अतिशय तत्परतेने केली आहे. तर इतर सामान्य शिक्षकांनी बदल्यांसाठी केलेल्या अर्जांना केराची टोपली दाखवल्याने पालिका शाळांमधील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला झाला आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आठ भाषेमधील ११00 शाळा चालवण्यात येतात. या शाळेमधून १५ हजार शिक्षक कार्यरत आहेत. पालिका प्राथमिक शाळांमध्ये काम करणार्‍या शिक्षकांची सेवा ही बदलीस पात्र आहे. शिक्षकांच्या बदल्या प्रतिवर्षी प्रशासकीय आणि वैद्यकीय कारणास्तव करण्यात येतात. दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या एप्रिल महिन्यात केल्या जातात. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शाळा व्यवस्थापकाला शिक्षकांसाठी वर्ग वाटणी करणे अधिक सोयीचे जाते. बदल्यांबाबत पालिका प्रशासनाने निश्‍चित असे निकषही ठरवण्यात आले आहेत. असे असतानादेखील या वर्षी मात्र अजूनपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. शिक्षणाधिकार्‍यांच्या निर्णय न घेण्याच्या वृत्तीचा फटका शिक्षकांच्या बदल्यांना बसला आहे. 

जुलै महिना उजाडला तरी शिक्षकांच्या बदल्या खोळंबल्या आहेत. त्याचा फटका शिक्षकांना बसत आहे. शिक्षकांच्या मागणी बदल्यांबाबत जाणीवपूर्वक अटकाव करणार्‍या शिक्षणाधिकार्‍यांनी महापौरांनी सुचवलेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात कमालीची तत्परता दाखवली आहे. या शिक्षकांच्या तातडीने पगारासह बदल्या केल्याने इतर सामान्य शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. महापौरांकडे गेल्यावरच शिक्षकांच्या बदल्या होणार असतील तर शिक्षण अधिकारी कश्यासाठी बसवले आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages