मुंबई - शहरातील गल्ली बोळात उभ्या राहीलेल्या चकचकीत काचेच्या इमारती आता मृत्यूचा सापळा ठरु लागल्या आहेत.या इमारती उभारताना अग्निसुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जाताच शिवाय आग लागल्यावर धुर बाहेर जाण्यासाठी जागाच नसल्याने आग अटोक्यात आणण्यासाठी देखिल अडचणी हेत असतात.
अंधेरी येथील आज घडलेल्या घटनेत 22 मजल्याच्या इमारतीत आग धुमसत राहील्यामुळे अचानक भडका उडाला.महानगर पालिकेच्या नियमांप्रमाणे सात मजल्याच्या वरील इमारती बांधताना ठराविक मजल्यावर एक मजला मोकळा ठेवणे बंधनकार आहे.तसेच इमारत अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंधनकारक असते.मात्र,अनेक इमारतींमध्ये ही यंत्रणाच बंद असते.तसेच रिकामी मजले देखिल बंद करुन वापरले जातात.असाच प्रकार या इमारती असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.
काचेच्या इमारतींमध्ये आत जाण्यासाठी फक्त जिन्यांचा वापर हाच एकमेव पर्याय असतो.त्यामुळे अनेक वेळा बहूमजली इमारतींचे मजले चढत जवानांना आगिच्या ठिकाणी जावे लागते.अशा वेळी आग 15 व्या माळ्यावर असेल तर अग्निप्रतिबंधक उपकरणे आणि पोषखाचे वजन संभाळात जवानांना पायीच जावे लागते.यात त्यांची काम करण्याची क्षमता निम्मी संपलेली असते.असेही एका जवनाने सांगितले.
अशा इमारतींमध्ये बाचव कार्य करण्यास देखिल अडचणी येतात.संपुर्ण इमारत बंद असल्याने आत मध्ये अडकेलेल्या नागरीकांना बाहेर काढणे अवघड होते.अशा वेळीस काच फोडून त्यांना बाहेर काढावा लागते.अंधेरीच्या घटनेते देखिल आगीत अडकेलेल्या जवानांनी काचा फोडून हवा मोकळी खेळती ठेवली होती,त्यामुळे त्यांना या बंद इमारतीत श्वास घेणे शक्य झाले.
खासगी इमारतींमध्ये फायर ऑडिट करण्याची जबाबदारी पालिकेची नाही. ती जबाबदारी इमारतींच्या मालकांची असते. त्यांनी दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट केलेच पाहिजे अशी सक्ती आयुक्तांनी केली आहे. अग्निशमन यंत्रणा तपासूनच इमारतींना ओसी दिली जाते. दलाचे जवान इमारतींमध्ये जावून तपासणी करतात, मॉल थिएटर्स असा गर्दीच्या ठिकाणी दलाचे जवान जावून पाहणी करतात पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले.