मुंबईबाहेरील गोविंदांनाही मिळणार पालिका रुग्णालयात मोफत उपचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2014

मुंबईबाहेरील गोविंदांनाही मिळणार पालिका रुग्णालयात मोफत उपचार

मुंबई - मुंबईतील जखमी गोविंदांना महापालिका रुग्णालयात मोफत दिले जातात. परंतु शहराबाहेरुन येणाऱ्या जखमी गोविंदांनाही मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य समितीच्या अध्यक्ष गीता गवळी यांनी सांगितले.

जखमी गोविंदांना मोफत उपचार देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. परंतु, यात केवळ मुंबईतील गोविंद होते. परंतु, आता बाहेरील गोविंदांनाही मोफत उपचार देण्यात येतील. दहीहंडीच्या दिवशी ही आरोग्य सेवा 24 तास सुरू ठेवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दगडी चाळीत पुन्हा दहीहंडी 
दगडी चाळीतील बंद झालेला दहीहंडीचा उत्सव पुन्हा सुरू होणार असल्याचे गवळी यांनी सांगितले. चाळीतील दहीहंडी पथक केवळ सहा थर लावणार आहे. यातून समाज प्रबोधन करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS