बोअरवेलचे पाणी झोपड्यांना पुरवण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बोअरवेलचे पाणी झोपड्यांना पुरवण्याची मागणी

Share This
पालिकेने युद्धपातळीवर मुंबईतील विहिरी, बोअरवेलची दुरुस्ती करून त्यातील पाणी झोपडपट्टय़ांना पुरवावे, अशी मागणी मनसेचे नगरसेवक आणि माजी गटनेते दिलीप लांडे यांनी पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहून केली आहे. 
मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे सध्या मुंबईकरांना २0 टक्के पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास पाणीकपातीत आणखी वाढ करावी लागेल. या कपातीचा सर्वाधिक फटका झोपडपट्टीधारकांनाच बसतो. पाणी संकटावर मात करण्यासाठी वास्तविक शहर आणि उपनगरातील विहिरी व बोअरवेल नियमित स्वच्छ ठेवल्या असत्या तर त्यांचे पाणी आता वापरले असते. यामुळे महापालिकेने त्वरित विहिरी आणि बोअरवेल स्वच्छ करून त्यांचे पाणी झोपड्यांना पुरवल्यास पिण्याव्यतिरिक्त शौचालय, भांडी घासणे आदी कामांसाठी वापरता येईल. त्यामुळे पाणी संकटावर काही प्रमाणात मात करता येईल. यापुढे विहिरी व बोअरवेलसाठी पालिकेने अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी लांडे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages