विधवा, अपंग महिला योजनांपासून वंचित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विधवा, अपंग महिला योजनांपासून वंचित

Share This
महिला, बालकल्याण समितीची सभा तहकूब
मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे आणि सावळा गोंधळामुळे विधवा, गरीब आणि अपंग महिलांना शिलाई यंत्र, पीठाची चक्की आणि अन्य साधन सामग्रीच्या लाभापासून वंचित राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत उमटून ही बैठक तहकूब केली. शिवसेनेच्या सदस्या ज्योती सुतार यांनी समितीची सभा झटपट तहकूब करण्याची मागणी केली. त्याला सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. समितीच्या अध्यक्षा पूजा महाडेश्‍वर यांनी ही सभा तहकूब केली. 
'महापालिकेने वाटप केलेल्या यंत्रसामग्रीसाठी ११ हजार गरीब, विधवा आणि अपंग महिलांनी अर्ज केले होते. मात्र, त्याचे वितरण सुरू झाल्यावर आणि अर्ज प्राप्त झाल्यानंतर ही यंत्रसामग्री फक्त विधवा आणि अपंग महिलांसाठी असल्याचे जाहीर केले. मात्र लाभार्थीमध्ये गरीब महिलादेखील होत्या. त्या आता अपात्र ठरणार आहेत आणि ज्या अपंग व विधवा महिलांनी अर्जासोबत प्रमाणपत्र जोडलेले नाही, त्यासुद्धा अपात्र ठरणार आहेत. अर्जासोबत प्रमाणपत्र जोडले पाहिजे, असे या अपंग व विधवा महिलांना माहिती नव्हते. यंत्रसामग्रीच्या वाटपासाठी केलेली पाच कोटींची तरतूद कमी आहे,' याकडे सुतार यांनी समिती व पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. या सर्व बाबींबद्दल सुतार यांनी नाराजी व्यक्त करून, अर्ज केलेल्या सर्वच अपंग, विधवा आणि गरीब महिलांना यंत्रसामग्रीचे वाटप करावे आणि त्यासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages