मुंबईत दोन हजार खड्डे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत दोन हजार खड्डे

Share This
मुंबईत यंदा पावसाने कहर केला नसतानाही थोड्याशा पावसानंतर ठिकठिकाणी तब्बल दोन हजार खड्डे पडल्याची आणि त्यापैकी एक हजार ७00 खड्डे बुजवल्याची माहिती पालिकेतील विश्‍वसनीय गोटातून देण्यात आली. पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्याची जबाबदारी पालिकेच्या मध्यवर्ती यंत्रणेकडून काढून घेण्यात आली आहे आणि ती प्रत्येक म्हणजे २४ विभागांवर (वॉर्ड) दिली असून, प्रत्येक वॉर्डला चार कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी दिले आहेत; पण खड्डे बुजवण्याचे काम व्यवस्थित होत नाही. हे काम कंत्राटदारांकडे दिले असून, ते हे काम निकृष्ट दर्जाचे करत आहेत आणि विभाग अधिकार्‍यांचा आणि पालिकेचा वचक नसल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला. दोन हजारपैकी एक हजार ७00 खड्डे बुजवल्याची माहिती पालिकेचे अभियांत्रिकी संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी दिल्याचे आंबेरकर म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages