अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू तरुणांचे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2014

अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू तरुणांचे

भारतात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे जागतिक पातळीवर लक्षणीय असून, तरुणांचा देश असलेल्या भारतात अपघातांमध्ये कमावत्या हातांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. सन २०१३मध्ये देशभरात झालेल्या विविध अपघातांच्या घटना आण‌ि त्यात झालेल्या मृत्यूंचा लेखाजोखा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या 'अॅक्सिडेंट्स अॅण्ड सुसाइड्स इन इंडिया २०१३' या अहवालात मांडण्यात आला आहे. भारतात २०१३ मध्ये चार लाख ५१७ व्यक्तींच्या मृत्यूचे कारण अपघात असे नोंदविण्यात आले. यात १५ ते ४४ वर्षे वयोगटातील दोन लाख ७२ हजार ३२ जणांचा समावेश आहे.अपघाती मृत्यूशी संबंध‌ित वाहनांवर नजर टाकली असता, मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी २४.९ टक्के म्हणजेच, एक चतुर्थांश व्यक्ती दुचाकीवर प्रवास करत असल्याचे समोर आले.
आत्महत्यांमध्ये देशात अग्रभागी असण्याचा दुर्लौकिक मिरवणारा महाराष्ट्र अपघाती मृत्यूंमध्येही सगळ्यात पुढे असल्याचे दिसून आले आहे. देशातील एकूण अपघाती मृत्यूंपैकी तब्बल १५.७ टक्के (६२ हजार ७७०) मृत्यू महाराष्ट्रात झाल्याचे दिसून आले. देशातल्या महानगरांमध्ये झालेल्या अपघाती मृत्यूंपैकी, सर्वाधिक म्हणजेच १३.४ टक्के मृत्यू मुंबईतच झाले आहेत.

२०१३ मध्ये एकूण चार लाख ७५ हजार ६२५ अपघातांची नोंद झाली. यात एकूण एक लाख ६६ हजार ५०६ जणांचा मृत्यू झाला. अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात (एक लाख ३७ हजार ४२३) झाले आहेत. त्यापाठोपाठ रेल्वे-रस्ते अपघात एक हजार ३१८ मृत्यू झाले, तर रेल्वेच्या इतर अपघातांमध्ये २७ हजार ७६५ व्यक्तींचे मृत्यू ओढवले.

Post Bottom Ad

JPN NEWS