लहान मुले देणार पाणी बचावाचा कानमंत्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2014

लहान मुले देणार पाणी बचावाचा कानमंत्र

save water 1
लहान मुले हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. त्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी आतापासूनच तरतूद करणे आवश्यक आहे. मग ती तरतूद आर्थिक स्वरूपातील असो किंवा मग इतर स्वरूपातील असो, निसर्गाशी नाते सांगणारी तरतूद खूपच कमी पालक करतात. मात्र आता चिमुरडेच निसर्गाशी अनोखे नाते जोडणार आहेत. ही लहान मुले आता पाणी वाचवाचा नारा देताना पाहायला मिळणार आहेत. प्रोजेक्ट सनलाईटच्या माध्यमातून पाणी वाचविण्याचे वेगवेगळे उपाय सांगण्यात येणार आहेत. 

`सनलाईट’ या उपक्रमांतर्गत एक संकेतस्थळ तयार करण्यात आले असून यामध्ये लहान मुलांनी पाणी कशाप्रकारे साठविले याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यशस चॅटर्जी, पूजा वलोटिया, कृष्णा खेतान, वेद परांजपे अशा काही लहान मुलांच्या कथा या संकेतस्थळावर वाचायला मिळणार आहे. वेद परांजपेने आपल्या सोसायटीच्या आवारामध्ये आपल्या पालकांच्या मदतीने रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प राबविला आहे. त्याने हा प्रकल्प कशा प्रकारे राबविला आणि त्याचा फायदा रहिवाशांना कशाप्रकारे झाला याचा धांडोळा या संकेतस्थळावर मांडण्यात आला आहे. याशिवाय या लहानग्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कशाप्रकारे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला त्याच्या रंजक कथाही आहेत. इंडोनेशिया, इंग्लंड, ब्राझील, अमेरिका या देशांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येतो. आतापर्यंत भारतातून या उपक्रमासाठी तब्बल 4 लाख लोकांचे सहकार्य आणि हातभार लाभला आहे

Post Bottom Ad

JPN NEWS