'ई-टेंडरिंग' पद्धत रद्द करण्याची नगरसेवकांची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'ई-टेंडरिंग' पद्धत रद्द करण्याची नगरसेवकांची मागणी

Share This
पालिका प्रशासनाने सुरू केलेली 'ई-टेंडरिंग' पद्धत रद्द करण्याची आणि 'सीडब्ल्यूसी'मार्फतच नागरी विकासाची सर्व कामे करून घेण्याची एकमुखी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी पालिकेच्या सभेत केली. मात्र प्रशासनाने 'ई-टेंडरिंग' रद्द केले नाही, तर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याविरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडण्याचा इशारा मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव, शिवसेनेचे राजू पेडणेकर यांनी दिला. महापौर सुनील प्रभू यांनीही नगरसेवकांच्या या मागणीला पाठिंबा देताना पालिकेच्या आगामी सभेत प्रशासनातर्फे यावर निवेदन करण्याचे आदेश दिले. 
सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी एका निवेदनाद्वारे, 'ई-टेंडरिंग' पद्धतीला विरोध करताना यामुळे विकासकामे रखडतात, कामे अर्धवट राहत असल्यामुळे नगरसेवकांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागते, असे सांगताना ही पद्धत रद्द करण्याची मागणी केली. विश्‍वासराव यांच्या निवेदनाला माजी महापौर श्रद्धा जाधव, रमेश कोरगावकर, मोहसिन हैदर, शीतल म्हात्रे, प्रकाश दरेकर, अवकाश जाधव, वकारून्नीसा अन्सारी यांनीही पाठिंबा दिला. महापौर प्रभू यांनीही 'ई टेंडरिंग'मुळे विकासकामे रखडली असल्याने नगरसेवकांना व नागरिकांना त्रास होत आहेत, असे सांगितले. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने 'सीडब्ल्युसी'मार्फतच विकासकामे करण्याची मागणी त्यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages