कोकणकन्या आरक्षणात झोल = आठवडाभरात चौकशी होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोकणकन्या आरक्षणात झोल = आठवडाभरात चौकशी होणार

Share This
मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना 28 जूनच्या कोकणकन्या एक्‍स्प्रेसचे आरक्षण एका मिनिटात पूर्ण झाल्याने धक्का बसला होता. आरक्षण करण्यास गेलेल्या नागरिकांना प्रतीक्षा यादीवरील तिकिटे मिळाली होती. या प्रकारात दलालांचा हात असल्याची शक्‍यता वर्तवली जात होती. या रेल्वेगाडीच्या आरक्षित 2500 तिकिटांपैकी 10 टक्के म्हणजे तब्बल 250 तिकिटे रद्द करण्यात आल्याने या शक्‍यतेला पुष्टी मिळाली आहे. मध्य रेल्वेने खासदार किरीट सोमय्या यांना ही माहिती दिली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी या घटनेमागे दलालांचा आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला होता; तसेच चौकशीची मागणी केली होती; मात्र यात कोणताही घोटाळा नसल्याचा दावा रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केला होता. याबाबत मध्य रेल्वेने चौकशी सुरू केली आहे. चौकशी सुरू झाल्यावर अवघ्या दोन दिवसांत 2500 आरक्षित तिकिटांपैकी 250 तिकिटे रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर हेमंतकुमार सूद यांनी दिल्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. सोमय्या यांनी गुरुवारी सूद यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. या प्रकरणाची चौकशी आठवडाभरात पूर्ण होईल. एकूण आरक्षणापैकी 20 टक्के ऑनलाईन पद्धतीने आणि 80 टक्के तिकीट खिडक्‍यांवर होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages