मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

Share This
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुवात झाली असून येत्या 31 जुलै 2014 पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्र, वाणिज्य आणि व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि शैक्षणिक सेवा विभागाच्या अनेक शिक्षणक्रमांचा पर्याय खुला आहे. त्यापैकी प्रामुख्याने पूर्वतयारी शिक्षणक्रम बी.ए., बी.ए. जनसंज्ञापन वफत्तपत्रविद्या, बी.कॉम., बी.लिब., एम.लिब., शालेय व्यवस्थापन, बालसंगोपन, स्वयंसहाय्यता गट, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, बी.ए. ग्राहक सेवा, सहकार व्यवस्थापन असे विविध शिक्षणक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जवळच्या मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राला भेट द्यावी किंवा  www.ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages