मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची लहान बहीण हसीना परकार (५४) हिचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नागपाडा भागातील गॉर्डन इमारतीतील आलिशान फ्लॅटमध्ये राहणार्या हसीनाच्या छातीत दुखू लागल्यानंतर तिला तत्काळ डोंगरी-उमरखाडी येथील हबीब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हसीनाच्या निधनाचे वृत्त दक्षिण मुंबईत पसरताच अनेकांनी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली. पोलिसांनी या भागात मोठा बंदोबस्त ठेवला होता.
दक्षिण मुंबईतील दाऊदची बेनामी संपत्ती व मालमत्तेचा सांभाळ हसीना करीत असे. अंधेरी येथील एक बिल्डर अलवानी याला खंडणीसाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी हसीना हिला २00७-0८ मध्ये अटक केली होती. ती आठ दिवस कोठडीत होती, असे पोलिसांनी सांगितले. वादग्रस्त व्यक्तिमत्व असलेल्या हसीनाविरुद्ध पोलिसांत अनेक तक्रारी होत्या. दक्षिण मुंबईतील पाकमोडिया, डोंगरी, महम्मद अली रोड, भेंडीबाजार, पायधुनी आदी मुस्लिम भागात हसीना 'आपा' व 'लेडी डॉन' नावाने ओळखली जात असे. अनेक वादग्रस्त व मालमत्तेच्या प्रकरणात समेट घडवून आणण्याचे काम हसीना करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शाळा व महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे कामही हसीना दाऊद याच्या नावाने करत असे यामुळे तिच्या निवासस्थानी नेहमी लोकांची वर्दळ असे. हसीनाचा पती इब्राहिम परकार याची १९९१ मध्ये अरब गल्ली येथे अरुण गवळी याच्या टोळीने हत्या केली. या हत्येचा बदला म्हणून दाऊद याने १९९२ मध्ये जे. जे. हत्याकांड घडवून आणले. या हत्येमध्ये गवळी टोळीचा शार्प शूटर शैलेश हळदणकर व त्याच्या साथीदाराचा खात्मा करण्यात आला. या हत्याकांडात दोघा पोलीस शिपायांचा हकनाक बळी गेला होता. पतीच्या हत्येनंतर दाऊदने आपल्या मुंबईतील सर्व मालमत्ता व संपत्ती सांभाळण्याचे काम हसीनाकडे सोपवले होते. हसीनाला दोन मुली व दोन मुलगे असल्याचे सांगण्यात आले. दाऊदची मालमत्ता सांभाळण्याबरोबर हसीना त्याच्या नावाने खंडणी उकळण्याचे कामही करीत असे. दाऊदच्या नावामुळे हसीनाचा दक्षिण मुंबईतील अनेक भागात दबदबा होता.
'एसआरए' योजनेअंतर्गत तीने दक्षिण मुंबईतील अनेक इमारतींच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले होते. त्यामुळे बांधकाम व्यवसायातही हसीनाचे नाव घेतले जात होते. अनेक बिल्डरांना ती आर्थिक मदत करीत असे. दक्षिण मुंबईतील कोणतेही काम तिच्या मर्जीवर चालत असे. अनेक बिल्डरांवर तिचा दबदबा होता. दाऊदची बहीण म्हणून तिला अनेक बिल्डर व व्यापारी घाबरत असत. दाऊद कुटुंबात ७ भाऊ व ५ बहीण असा बारा जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. हसीना ही दाऊदची लहान बहीण असल्यामुळे तिच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. हसीनाच्या निधनामुळे दाऊदला मोठा हादरा बसला आहे. रात्री उशिरा मरिन लाईन्स येतील बडा कब्रस्तानमध्ये त्यांचा दफणविधी होणार आहे. तिच्या दफणविधीसाठी गुन्हेगार जगतातील कोण कोण व्यक्ती येतात यावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.