मुलांनाे भविष्यात तुम्हाला काय व्हायचे असेल तर तुम्ही लिडर बनले पाहीजे,मग ते काेणतेही क्षैत्र असाे असे मत महीला व बालविकास कल्याण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी व्यक्त केले.त्या दहावी व बारावी परिक्षेत गुणवंत विद्यार्थींच्या सत्कार समारंभात मार्गदर्शन करत असताना बाेलत हाेत्या.माजी खासदार एकनाथजी गायकवाड आणि ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी धारावी परिसरातील गुणवंत विद्यार्थांचा क्रिडा संकुल धारावी येेथे सत्कार समारंभ आयाेजित केला हाेता.
या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून वित्त व नियाेजन मंत्री राजेंद्र मुळक हे उपस्थित हाेते.शिवाय माजी खासदार एकनाथ गायकवाड,प्रधान सचिव उज्वल उके,प्रभाग समिती अध्यक्ष वकील शेख,मुकूद चंद आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित हाेते.तसेच पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित हाेते.कार्यक्रमाच्या सुरवातीला वर्षाताई गायकवाड यांनी वित्त व नियाेजन मंत्री राजेंद्र मुळक यांचा तथागत जगाला शांततेचा संदेश देणा-या गैातम बुद्दांची मुर्ती व शाल,श्रीफळ भेट देवुन सत्कार केला.यावेळी वर्षाताईंच्या हस्ते धारावीतील वैष्णवी विजय पवार (९४%) मार्क मिळविल्याबद्दल एक टँबलेट भेट देवुन सत्कार केला.तसेच ९० च्या पुढे मार्क मिळवुन उत्तीर्ण झालेले रचना कदम,सय्यद अब्दुल खान,आकाश माने,ह्रतिका राजन यांच्यासह ६२ विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये धारावी परिसरातील ८० ते ९० टक्के प्राप्त ३५९ विद्यार्थी,७० ते ८० टक्के प्राप्त ५७० विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभात विद्यार्थांना मार्गदर्शन करताना वर्षाताई पुढे म्हणाल्या की, आज काेणही मुले राजकारणारख्या क्षेत्रात येवुन करिअर करायचे बाेलतच नाही.या मागील प्रेरणा काय असावी याचा विचारच काेणी करीत नाही.सर्वजन बाेलत आहेत मला डाँक्टर व्हायचे,इंजिनिअर व्हाँयचे, मग राजकारण का नकाे.परंतु मुलांनाे मी एवढेच.सांगेन की देश काेण बनवताे,देशाचे कायदे काेण बनवताे. मुलांनाे देश बदलण्याची ताकद राजकारणात आहे.तुम्हीही राजकारणात पुढे उतरले पाहीजे आणि करियर बनविले पाहीजे.तुम्ही प्रत्येक क्षेत्रात एक लिडर.बनले पाहीजे.मग ते काेणतेही असाे डाँक्टर, वकिल, आयएसआय, पाेलिस आँफिसर किंवा इंजिनिअर.परंतु एक उत्तम नेता जरुर बनले पाहीजे. राजकारणासारख्या क्षेत्रात तुम्हाला गरीब जनतेसाठी काम करुन तुम्ही तुमची आेळख बनवु शकता.तुमच्या कार्यक्षेत्रात काेणते कार्य अपुरे आहे याचे भान ठेवुन ते तुम्ही पुर्ण करु शकता.
यावेळी वर्षाताईंनी एमएमआरडीएच्या माध्यमातुन बांधण्यात आलेल्या धारावी क्रिडा संकुलचे चित्रफित दाखवुन या संकुलात खेळांसाठी काेणकाेणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती दिली.आणि मुलांनी या माध्यमातुन जास्तीत जास्त लाभ घेवुन क्रिडा क्षेत्रात चमक दाखविण्याचे आवाहन केले.शिवाय धारावीचे नाव आज जगात घेतले जातेय याचे महत्त्वही मुलांना सांगितले. माजी खासदार एकनाथ गायकवाड व प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थांनी धारावी सारख्या भागात अथक परिश्रम घेवुन महाराष्ट्रमध्ये नाव गाजविलेले आहे.या भागात गरीब,दिन दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजातील ज्या विद्यार्थांनी काबाडकष्ट करुन आपलं नाव कमवुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी हा सत्कार समारंभ आयाेजित केला हाेता.अशा अनेक वर्षापासुन वर्षाताई मुलांना नवी उमेदी देत आहेत.धारावीसारख्या भागात शिक्षणापासून अनेक लाेक वंचित हाेते.म्हणुन त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने धारावीमध्ये राजर्षी शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय स्थापन करुन शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली.वर्षाताईंच्या या शैक्षणिक उपक्रमाचा उपस्थित बहुसंख्य पालकवर्गातुन काैतुक केला जात आहे.
