मुंबई- गरीब आणि गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी पालिकेने अर्थसंकल्पात "विशेष राखीव निधी'ची व्यवस्था करावी या मागणीला पालिकेच्या विधी समितीने मंजूरी दिली. पालिकेच्या सभागृहाची या प्रस्तावाला मंजूरी
मिळाल्यास रुग्णांना चांगला दिलासा मिळू शकेल असा विश्वास विधी समितीचे अध्यक्ष ऍड. ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील नागरिकांचे आरोग्य सुधारावे यासाठी पालिका अद्ययावत सुविधा पुरविते. मात्र पालिकेच्या रुग्णालयात ज्या अवघड शस्त्रक्रिया होत नाहीत अशा शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. अशा शस्त्रक्रियांचा खर्च गरीब रुग्णांना परवडणारा नसतो. पैशाअभावी उपचार न
मिळाल्यास जीवावर बेतू शकते. यासाठी पालिकेने गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसंकल्पात एक विशेष राखीव निधी ठेवावा अशी मागणी नगररेविका रूपाली रावराणे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. राजीव
गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून गरीब रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे अशा निधीची गरज नाही असे मत यापूर्वी प्रशासनाने या ठरावाच्या सुचनेवर दिले होते. मात्र विधी
समितीच्या बैठकीत प्रशासनाने असा निधी उभारण्यात संमती दर्शविल्याची माहिती अध्यक्ष ऍड. शर्मा यांनी दिली. रावराणे यांच्या ठरावाच्या सुचनेला मंजूरी मिळाली असून ही सुचना पालिकेच्या महासभेत मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे.