मुंबई - मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवारी (ता. 13) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंडदरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात या मार्गावरील उपनगरी जलद गाड्या धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील. त्या शीव-मुलुंडदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावतील. ठाण्याहून पुढे त्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ठाण्याहून सीएसटीसाठी सुटणाऱ्या जलद गाड्या सकाळी 10.45 ते दुपारी 3.30 या वेळेत मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी स्थानकांवर थांबतील. येथील जलद गाड्या 20 आणि धीम्या गाड्या 15 मिनिटे उशिरा धावतील.
हार्बर रेल्वेमार्गावरील सीएसटी-अंधेरीदरम्यानची सेवा सकाळी 10.45 ते दुपारी 3.15 या वेळेत बंद राहील. या वेळेत प्रवाशांना त्याच तिकीट आणि पासावर मुख्य मार्गावरून प्रवासाची मुभा दिली आहे. कुर्ला येथून सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी 11 ते दुपारी 3.30 पर्यंत मुख्य मार्गावरून धावतील. त्या करी रोड आणि चिंचपोकळी स्थानकांवर थांबणार नाहीत.
पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव-सांताक्रूझ स्थानकांदरम्यान दोन्ही जलद मार्गांवर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे येथील जलद गाड्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील.