- सबका साथ सबका विकास हेच अर्थसंकल्पाचे उद्दीष्ट
- जागतिक मंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे
- कठोर निर्णय घेतल्याशिवाय अर्थव्यवस्था सुधारणार नाही
- अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उत्पन्नाची साधने वाढविण्यात येणार
- लोकप्रिय निर्णयांची नागरिकांनी फारशी अपेक्षा ठेवू नये
- वित्तीय तूट कमी करण्याचे आर्थिक मंत्रालयासमोर मोठे आव्हान
- वित्तीय तूट तीन वर्षांत दोन टक्क्यांवर आणणार
- पुढच्या काळात विकास वाढविण्यावर भर देण्यात येणार
- सबसिडी योग्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे सरकारचे ध्येय आहे
- देशाने बदलासाठी भाजपला सत्तेवर आणले आहे
- निर्णय घेण्यास उशीर झाल्याने अनेक संधी हुकल्या आहेत
- गरीब लोक मध्यमवर्गात येऊ पाहत आहेत
- नोकरीप्रधान उद्योगांना काही संधी मिळणार आहेत
- 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याची सरकारची योजना आहे
- कच्च्या तेलाच्या सबसिडीचे ओझ कमी करण्याचे मोठे आव्हान आहे
- खर्च कमी करण्यासाठी सरकार काही योजना आणणार आहे
- विकासदर दोन आकड्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे
- महागाई कमी करण्यासाठी भर देणार
- पूर्वलक्षी प्रभावाने कोणताही कर लागू होणार नाही
- सबसिडी कमी करून गरीब लोकांपर्यंतच पोहचविण्यात येणार
- या वर्षअखेर जीएसटी आवश्यक कायदा आणणार
- कायद्याच्या कचाट्यातील कर सोडविण्यासाठी नवे न्यायालय स्थापन करणार
- देशाच्या विकासाला आवश्यक असेल तेथे थेट परकी गुंतवणुक (एफडीआय)
- उत्पादन क्षेत्रात एफडीआय आणण्याची गरज आहे
- नोकऱ्या वाढविण्यासाठी उत्पादन क्षेत्रात एफडीआय आवश्यक
- विमा व संरक्षण क्षेत्रातील एफडीआय 49 टक्क्यांवर नेणार
- खर्च आटोक्यात आणण्यासाठी आयोग स्थापन करणार
- रियल इस्टेट क्षेत्रात मर्यादीत स्वरुपात एफडीआय आणणार
- सरकारी बँकांत निर्गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणार
- सरकारी बँकांचे शेअर्स सामन्य नागरिकांनाही मिळणार
- 100 स्मार्ट शहरे बनविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे
- स्मार्ट शहरांसाठी 7 हजार 60 कोटी रुपयांची तरतूद
- सरकार बँकांचे शेअर्स विकून भांडवल उभारणार
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी 1 हजार कोटींची तरतूद
- देशातील सिंचन वाढविण्यासाठी ही योजना आहे
- देशभरात 24 तास वीजपुरवठा हे सरकारचे ध्येय आहे
- सरदार पटेल यांच्या स्मारकासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद
- महात्मा गांधी स्वच्छता अभियान सुरू करणार
- अनूसुचित जाती-जमातींसाठी 50 हजार 584 कोटींची तरतूद
- आदिवासींसाठी वनबंधू कल्याण योजनेसाठी 100 कोटींची तरतूद
- 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना लागू करणार
- दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती अभियान सुरू करणार
- सर्व घरात 24 विजेसाठी ग्रामज्योती योजना
- अपंग कल्याणासाठी वेगळी संस्थांची उभारणा
- पर्यटनाला चालना देण्यासाठी ई विजा योजना लागू करणार
- येत्या सहा महिन्यांत ई विजा योजना सुरू करणार
- अंधांसाठी नोटांमध्ये ब्रेल लिपीचा वापर करण्याची योजना
- रस्त्यांवर महिलांवर होणारे अत्याचारा रोखण्यासाठी 100 कोटींची तरतूद
- सर्व क्षेत्रातील संघटीत कामगारांसाठी किमान एक हजार रुपये पेन्शन
- बेटी बचाव बेटी बढाओ योजनेसाठी 100 कोटींची तरतूद
- प्रधानमंत्री सिंचन योजनेसाठी 100 कोटींची तरतूद
- स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी 3 हजार 600 कोटींची तरतूद
- गोरगरिबांना घरे मिळण्यासाठी 8 हजार कोटींची तरतूद
- टीबी उपचारासाठी देशभरात दोन मोठी केंद्रे उभारणार
- देशभरात चार नवी एम्स रुग्णालये उभारणार, यातील एक विदर्भात उभारणार
- चार नव्या एम्ससाठी 400 कोटींची तरतूद
- युवकांसाठी स्किल्ड योजनेची सुरवात करणार
- सरकार नवी 12 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार
- चार नवी आयआयटी आणि आयआयएमची स्थापना करणार, महाराष्ट्रातही आयआयएम सुरू करणार
- व्हर्च्युअल क्लासरूमसाठी 100 कोटींची तरतूद
- येत्या काळात प्रत्येक राज्यात चार नवी एम्स रुग्णालये उभारणार
- कन्या शाळांमध्ये पिण्याचे पाणी, टॉयलेट्स उभारण्याची योजना
- सुशासनासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद
- 600 नव्या कम्युनिटी स्टेशन्सची सुरवात करणार
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 14389 कोटींची तरतूद
- ग्रामीण भागातीय आयटी शिक्षणासाठी 500 कोटींची तरतूद
- शहरातील स्वच्छता अभियानास 50 हजार कोटींची तरतूद
- बांधा, वापरा व हस्तांतरीत तत्त्वावर मेट्रो प्रकल्प सुरू करणार
- झोपडपट्टी विकासासाठी सरकार लवकरच नवी योजना सुरू करणार
- शेती फायद्यात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार
- मदरशांतील शाळांच्या विकासासाठी 100 कोटींची तरतूद
- चेन्नई व दिल्लीत नव्या वैद्यकीय संस्था सुरू करणार
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी दोन नवी केंद्रे स्थापन करणार
- स्वस्त घरांसाठी चार हजार कोटींची तरतूद
- पुण्यातील एफटीआयला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा
- लखनौ व अहमदाबादमध्ये मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार
- सिंचनासाठी एक हजार कोटींची तरतूद
- किसान विकास पत्र योजना पुन्हा सुरू करणार
- पर्यावरण बदलाचा अभ्यास करण्यासाठी 100 कोटींची तरतूद
- बाजारसमित्यांना पर्याय म्हणून खासगी मार्केटचा पर्याय सुरू करणार
- शेतकऱ्यांना आठ लाख कोटींचे कर्ज उपलब्ध करून देणार
- वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के दराने कर्ज देणार
- महागाई रोखण्यासाठी 500 कोटींचा विशेष फंड
- कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी 5 हजार कोटींची तरतूद
- शेतकऱ्यांसाठी विशेष वाहिनी सुरू करण्यात येणार
- शेतीच्या नव्या वाहिनीसाठी 100 कोटींची तरतूद
- राष्ट्रीय उद्योग कॉरिडोरचे मुख्यालय पुण्यात सुरू करणार
- यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे
- उद्योगाच्या उत्पादनासाठी एसईझेड उभारण्याची योजना
- प्राथमिक शिक्षणासाठी 5 हजार कोटींची तरतूद
- बरेली, लखनौसह सहा शहरांत टेक्सटाईल क्लस्टर उभारण्यात येणार, यासाठी 200 कोटींची तरतूद
- हस्तकला अकादमी दिल्लीत उभारण्यात येणार, त्यासाठी 30 कोटींची तरतूद
- जम्मूच्या पश्मिना कलेच्या विकासासाठी 50 कोटींची तरतूद
- 16 नवी बंदरे उभारण्यात येणार, बंदर जोडणीसाठी प्रयत्न करण्यात येणार
- सात इंडस्ट्रियल स्मार्ट शहरे उभारण्याची योजना
- लघु उद्योगाच्या विकासाठी केंद्र सरकार समिती स्थापन करणार
- देश पातळीवर एक मार्केटची योजना
- अलाहाबादपासून 1600 किमीचा गंगेतून जाणारा जलमार्ग उभारणार
- गंगा जलमार्गासाठी सरकार चार हजार कोटी रुपये देणार
- देशात रस्त्याचे जाळे उभारण्यासाठी 37 हजार 800 कोटींची तरतूद
- ईशान्य भारतातील रस्त्यांसाठी 3 हजार कोटींची तरतूद
- औष्णिक विजेसाठी 100 कोटी रुपये खर्च करणार
- 8500 किमी रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दीष्ट आहे
- कृषीपंपांना सौरउर्जेसाठी 500 कोटींची तरतूद
- 15 हजार किलोमीटरच्या गॅस पाईपलाईन पीपीपतून उभारण्यात येणार
- खाण क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे
- खाण क्षेत्रातील रॉयल्टीचा पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापणार
- कर्ज पुर्नबांधणीसाठी नाबार्डकडे 5000 कोटींचा फंड
- एकाच अकाउंटमध्ये विविध गुंतवणुकीची सुविधा मिळणार
- एक डीमॅट, एक केवायसी गुंतवणूक प्रक्रिया सोपी करणार
- प्रत्येक परिवाराकडे बँक अकाऊंट असेल
- विमा योजना जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार
- संरक्षणासाठी 2 लाख 29 हजार कोटींची तरतूद
- सीमेवरच्या पायाभूत विकासाठी 2 हजार 500 कोटींची तरतूद
- छोट्या बचतीला प्राधान्या, मुलींसाठी नवी विमा योजना
- पीपीएफ खात्यातील गुंतवणूक रक्कम एक लाखावरून दीड लाखांपर्यंत वाढविण्यात येणार
- करमुक्त गुंतवणुकीत थेट 50 हजारांची वाढ
- नदीजोड प्रकल्पाच्या अभ्यासासाठी 100 कोटींची तरतूद
- नद्या जोड प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करणार
- नदी किनाऱ्यांच्या विकासासाठी 100 कोटींची तरतूद
- पुण्यात बायोटेक्नॉलॉ क्लस्टर सुरू करणार
- मणिपूरला क्रीडा विद्यापीठ सुरू करणार, यासाठी 100 कोटींची तरतूद
