दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2014

दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱया शैक्षणिक वर्ष 2015 च्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा बुधवारी जाहीर केल्या. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 26 मार्च 2015 या कालावधीमध्ये, तर दहावीची परीक्षा 3 मार्च ते 26 मार्च 2015 या कालावधीत घेण्यात येणार आहे. 
2014 मध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांचा गोंधळ संपल्यानंतर आता  2015 या शैक्षणिक वर्षांच्या परीक्षाचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. हॉलतिकिटांमध्ये नाव, आडनाव आणि आसनक्रमांकामध्ये असलेल्या चुका या आगामी काळात पुन्हा घडणार नाही यावर लक्ष देण्यात आले नाही तर विद्यार्थ्यांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS