खारे पाणी गोड करण्याची मागणी होत असतानाच खार्या पाण्याचे गोड पाणी करणे ही अत्यंत महागडी प्रक्रिया आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी दिली. सध्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता आणि जमिनीखालील पाण्याचे चांगले स्रोत पाहता मुंबई महापालिका सोसायट्यांना बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबईत रस्त्यांच्या खाली मोठय़ा जलवाहिन्या असल्याने बोअरवेल खोदण्यासाठी पालिका परवानगी देत नाही; पण सध्या जलाशयांमधील साठा पाहता सोसायट्यांना बोअरवेल खोदण्यासाठी पालिका परवानगी देईल. मात्र बोअरवेल खोदताना भूमिगत जलवाहिन्यांपासून दूर खोदणे सोसायट्यांना बंधनकारक असणार आहे. या बोअरवेलचे पाणी सोसायट्यांना पिण्यासाठी न वापरता अन्य कामांसाठी वापरता येणार आहे. सोसायट्यांनी पालिकेकडे अर्ज केल्यास ते स्वीकारण्यात येतील, असे जलोटा म्हणाले.
Post Top Ad
10 July 2014
Home
Unlabelled
सोसायट्यांना बोअरवेल खोदण्यासाठी महापालिका परवानगी देणार
सोसायट्यांना बोअरवेल खोदण्यासाठी महापालिका परवानगी देणार
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

