अंधेरी येथील लोटस बिजनेस पार्क या इमारतीला लागलेली आग विजवताना मृत्यूमुखी पडलेले नितीन येवलेकर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. परंतू मुख्य अग्निशमन अधिकारी ए. एल. शर्मा यांनी येवलेकर कुटुंबियांना दिलेल्या लेखी आश्वासना नंतर नितीन येवलेकर यांचा मृतदेह ताब्यात घेवून विरार त्यांच्या राहत्या घरी पार्थिव नेवून अंत्यसंस्कार आले.
अंधेरी येथील लोटस बिजनेस पार्क या इमारतीला शुक्रवारी सकाळी आग लागली होती. हि आग विजवताना नितीन येवलेकर यांचा आगीत भाजून मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाने नितीन येवलेकर यांना शनिवारी सकाळी भायखळा येथील मुख्यालयामध्ये गार्ड ऑफ हॉनर दिला. गार्ड ऑफ हॉनर दिल्यावर येवलेकर यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांकडे येणार होते. परंतू या आधी आग विझवताना कित्तेक अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असला तरी कित्तेक वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई तसेच वारसांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. असा अनुभव असल्याने येवलेकर यांच्या पत्नी शुभांगी व त्यांच्या परिवाराने पार्थिव घेण्यास नकार देवून लेखी आश्वासन देण्याची मागणी केली.
येवलेकर यांच्या दोन लहान मुली असून सोहा हि ३ वर्षाची तर सान्वी हि १८ महिन्याची आहे. या दोन्ही लहान मुलीनीच्या शिक्षण बाकी असल्याने मृत नितीन येवलेकर यांच्या कुटुंबीयांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला होता. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी ए. एल. शर्मा यांनी लेखी आश्वासन देवून एक महिन्यात कारवाही करू असे म्हटले आहे. मुख्य अग्निशमन अधिकारयाने लेखी आश्वासन नंतर पार्थिव ताब्यात घेवून येवलेकर यांच्या विरार येथील घरी नेवून नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसीएशन व महानगर कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी अग्निशमन दलामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करावी. अधिकारी आणि जवान यांचा बळी देवून आग विझवण्याची पद्धत बंद करावी तसेच आग विझवताना येवलेकर यांच्या झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
