आगीसाठी कारणीभूत असलेल्या दोषींवर कठोर कारवाईचे महापौरांचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2014

आगीसाठी कारणीभूत असलेल्या दोषींवर कठोर कारवाईचे महापौरांचे निर्देश

अंधेरी लिंक रोडवरील लोटस बिसनेस पार्क इमारतीच्या एकविसाव्या व बाविसाव्या मजल्यांना काल भीषण आग लागली. ही आग विझवताना अग्निशमन दलातील एका अग्निशमन जवानास आपला प्राण गमवावा लागला . या इमारतींची कारणे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापौर सुनील प्रभू यांनी महापालिका प्रशासनास आज दिले आहेत .   

ही  इमारत बांधताना आपत्तीजन व्यवस्थापनाचे सर्व नियम पाळण्यात आले आहेत का ? तसेच महापालिका प्रशासन व अन्य प्राधिकरण यांच्याकडून अत्यावश्यक त्या  परवानग्या, आग विझवण्याची साधने, फायर ऑडीट ची कार्यवाही सदर इमारतीच्या मालकाने पूर्ण केलीहोती का ? याबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश आज प्रभूंनी पालिका प्रशासनास दिले .  तसेच शहीद झालेल्या नितीन इवलेकर या जवानाच्या कुटुंबियाला १५ लाख इतकी आर्थिक मदत आठ  दिवसात देण्यात येईल , तर त्याच्या कुटुंबातील एका वाराशास महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येईल असेही महापौर यांनी यावेळी सांगितले. 

तसेच अशा प्रकारच्या घटना मुंबईसारख्या शहरात होऊ नयेत यासाठी उंच इमारतीच्या बाबतीत आपत्ती व्यवस्थापनाने कायद्याचे पुनर्रव्यवस्थापन करण्यासाठी सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देशही महापौरांनी पालिका प्रशासनास दिले असून या सुधारित नियमावलीमुळे अश्याप्रकारच्या संभाव्य घटना मुंबई शहरात घडणार नाहीत . त्यामुळे संभाव्य वित्त व जीवित हानी होणार नाही यासाठी काळजी घेण्याचे निर्देशही महापौरांनी पालिका प्रशासनास दिले आहेत   

Post Bottom Ad

JPN NEWS