खासगी विहिरी ताब्यात घेण्याचे प्रयत्न - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खासगी विहिरी ताब्यात घेण्याचे प्रयत्न

Share This
मुंबई - खासगी विहिरींतून बेसुमार उपसा करून पैसा कमावणाऱ्या टॅंकरमाफियांवर अंकुश ठेवला जाण्याची शक्‍यता आहे. महापालिकेने खासगी विहिरी ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. 
पाऊस अपुरा झाल्यामुळे सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे जलबोगदे असलेला भाग सोडून इतर ठिकाणी नवीन बोअरवेल खोदण्यास परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुंबईत अनेक खासगी विहिरी असून, त्यातील पाणी टॅंकर लॉबी विकते. या विहिरी ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले. उद्यानांसाठी असलेल्या जलजोडण्या खंडित करून तिथे पर्यायी स्रोतांचा वापर करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व इमारतींच्या आवारातही बोअरवेल खोदण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages