मेट्रोच्या बारा स्थानकांवर वाय-फाय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2014

मेट्रोच्या बारा स्थानकांवर वाय-फाय

अंधेरी : मेट्रोच्या १२ स्थानकात आता वाय-फायची सुविधा देण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रा.लि.ने घेतला आहे. मात्र ही सुविधा प्रत्यक्ष मेट्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांचा काहीसा हीरमोड झाला आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक दिवसाला १५ मिनिटे विनाशुल्क वाय-फाय सुविधा मिळणार आहे. मात्र महिनाभरासाठीच ही सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर मात्र १८0 तासांसाठी म्हणजेच आठ दिवसांसाठी सवलतीच्या दरात १00 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पहिल्या ५ हजार प्रवाशांसाठी सवलतीची सुविधा असणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष मेट्रोत वाय-फाय सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS