मुलांना लहान वयातच मधुमेह पकडतोय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुलांना लहान वयातच मधुमेह पकडतोय

Share This
मुंबई: भारतात वयाच्या १४ वर्षांखालील हजार मुलांपैकी एका मुलाला टाइप १ चा मधुमेह झाल्याचे नुकत्याच झालेल्या अभ्यासात समोर आले आहे. टाइप १च्या मधुमेहाचे अस्तित्व शहरी लोकसंख्येत जास्त आहे. एवढेच नव्हे तर वयाच्या १२ वर्षांखालील मुलांमध्ये ही लक्षणे मोठय़ा प्रमाणावर दिसू लागली आहेत. टाइप १ या आजारात अनेक वेळा इन्सुलिनच्या उपचारांची गरज असते. त्यामुळे तो काळजी करण्यासारखा आजार आहे. 
टाइप १ मधुमेह हा प्रतिकारशक्तीशी संबंधित आजार असून त्यात शरीरातील प्रतिकारक पेशी इन्सुलिन निर्माण करणार्‍या पँक्रिएटिक पेशी नष्ट करतात. ग्लुकोजचा वापर करण्यासाठी इन्सुलिन नसल्यामुळे शरीराची उपासमार होते आणि मृत्यू होतो. सर्वसाधारणपणे टाइप १ मधुमेह वयाच्या २0 वर्षांखालील रुग्णांमध्ये किंवा त्याहीपेक्षा जास्त तरुण मुलांमध्ये दिसतो. टाइप १ चा मधुमेह हा कायमस्वरूपी आजार असून त्याला इन्सुलिनची गरज भासते. मुंबईतील एण्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. सुधींद्र कुलकर्णी, फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई यांनी आपल्याकडे अशा उपचारासाठी येणार्‍यांचे प्रमाण वाढल्याचे सांगून म्हटले आहे की, टाइप १ चा मधुमेह झालेल्या रुग्णांना आपली रक्तशर्करा योग्य पातळीत ठेवणे कठीण जाते. एक तर त्यांची रक्तशर्करा ५00 मिग्रॅ/डीएलपर्यंत वाढते किंवा ती अत्यंत कमी होऊन ५0 मिग्रॅ/डीएलपर्यंत जाते. 

मुलांमध्ये टाइप १ मधुमेहाचे निदान होत असल्यामुळे आणि इन्सुलिन इंजेक्शनचे व्यवस्थापन करणे कठीण असल्यामुळे अत्यंत कमी वयातच अनेकांमध्ये गुंतागुंतीची लक्षणे दिसतात. त्यातील अनेकजण अवघ्या विशीत किंवा तिशीत असतात, असेही त्यांनी सांगितले. अनेक अभ्यासांमधून टाइप १च्या व्यवस्थापनात आणि गुंतागुंत टाळण्यात इन्सुलिन पंपची परिणामकारकता दिसून आली आहे. डायबिटिस कंट्रोल अँण्ड कॉम्प्लिकेशन्स ट्रायल्स १0 वर्षे टाइप १चा मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये करण्यात आल्या. त्यातून इन्सुलिन पंप थेरपीचा वापर केल्यामुळे दीर्घकाळ गुंतागुंती डोळ्यांमध्ये (रेटिनोपॅथी), नसांमध्ये (न्यूरोपॅथी) आणि मूत्राशय (नेफ्रोपॅथी) अनुक्रमे ७६ टक्के, ६0 टक्के 
आणि ५४ टक्क्यांनी कमी होतात.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages