मुंबईत ४३० बेकायदा इमारती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत ४३० बेकायदा इमारती

Share This

पालिकेची परवानगी न घेता ७४ इमारती उभ्या राहिल्या

मुंबई - वरळीतील अनधिकृत कॅम्पाकोला प्रमाणेच मुंबईत ४३० बेकायदा इमारती अभारण्यात आल्या आहेत. त्यातील ७४ इमारती तर पालिकेची परवानगी न घेता उभ्या राहिल्या असल्याने पालिका आता या इमारती पाडण्यासाठी न्यायालयीन लढाईची तयारी करीत आहे. 
कॅम्पा कोला मधील इमारतींच्या बेकायदा मजल्यांचा वाद चिघळला असताना पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत ४३० बेकायदा इमारती आढळल्या. त्यापैकी ७४ इमारतींसाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. अन्य इमारतींमध्ये बेकायदा मजले बांधण्यात आले आहेत अथवा विनापरवानगी बदल करण्यात आले आहेत. अनेक इमारतींचे वाद न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे कायदेशीर बाजू तपासून महापालिकेची कारवाई सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात बोरिवलीत ९६ ; तर वरळीत ७८ इमारती बेकायदा असल्याचे आढळले.

बांधकाम सुरू करण्यापूर्वी इमारतीचे नकाशे पालिकेकडून मंजूर करून घ्यावे लागतात. उपलब्ध चटई क्षेत्र निर्देशांकानुसार (एफएसआय) इमारतींचे मजले ठरवले जातात. अनेक वेळा उपलब्ध एफएसआयपेक्षा जास्त बांधकाम केले जाते. असे मजले बेकायदा ठरतात. महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशांत फेरफार करून अतिरिक्त बांधकाम केले जाते. हे बांधकामही बेकायदा ठरवले जाते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages