मुंबई - आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या दीडशे कोटींच्या अनुदानापैकी 37 कोटी 50 लाखांचा पहिला हप्ता देण्यास प्रशासनाने मंजूर केला आहे. हा हप्ता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर होणार आहे.
बेस्टचा परिवहन विभाग तोट्यात असून त्याला आर्थिक मदत देण्यासाठी पालिकेने "स्वतंत्र नागरी परिवहन निधीस अंशदान‘ निधी तयार केला आहे. बेस्टने तिकीटदरात वाढ न करण्याच्या अटीवर हा निधी मंजूर केला होता. बेस्टला चार हप्त्यात दीडशे कोटी द्यायचे आहेत. 37 कोटी 50 लाखाचा पहिला हप्ता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला आहे.
बेस्टला 150 कोटी देण्यासाठी पालिकेने परिवहन निधी जमा करण्याची तरतूद 2014-15 आर्थिक वर्षात केली होती. वाहनतळ शुल्क, सार्वजनिक वाहनतळ उभारण्यासाठी दिले जाणारे प्रीमियम, भूमिगत सुविधांमधून मिळणारे उत्पन्न यातील रक्कम या अनुदानासासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.