मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची येत्या विधानसभेतही हि आघाडी कायम राहणार आहे , या आघाडीमार्फत राज्यातील २४ जागांवर पीआरपीने दावा केला असून दोन्ही कॉंग्रेसने यावर सकारात्मक विचार करावा अशी अपेक्षा या पक्षामार्फत व्यक्त करण्यात येत आहे ,सदर जागावाटपाची बोलणी करण्यासाठी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे हे येत्या बुधवारी (१३ ऑगष्ट ) मुख्यमंत्र्याची भेट घेवून आपला प्रस्ताव देणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसची पीआरपीचीसोबत आघाडी झाली होती ,या निवडणुकीत एकही जागा न लढविलेल्या पीआरपीला विधानसभेत मोक्याच्या जागा सोडण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. त्यानुसार विदर्भातील उमरेड,भंडारा,दर्यापूर,मुर्तीजा पूर,वाशीम,मेहकर,या अनुसूचित जाती मतदारसंघासह कामठी अर्जुनी मोरगाव,खानदेशातील देवळाली(एस.सी) भुसावळ(एस.सी ),नाशिक पूर्व ,पश्चिम महाराष्ट्रातील श्रीरामपूर,मिरज,इचलकरंजी,मरा ठवाड्यातील औरंगाबाद पश्चिम कळमनुरी,बदनापूर,(एस. सी ),आणि किनवट (एस.सी ), तसेच अंबरनाथ उल्हासनगर मानखुर्द-शिवाजी नगर आणि घाटकोपर पूर्व अशा २४ जागांसाठी पीआरपीचा आग्रह राहणार आहे ,
पीआरपीची काँग्रेससोबत आघाडी असलीतरी राष्ट्रवादीही या आघाडीचा घटक पक्ष असल्याने त्यांनीही आपल्या कोट्यातील काही जागा सोडाव्यात असा या पक्षाचा आग्रह राहणार आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबतही जागावाटपाची चर्चा करण्यात येणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसची पीआरपीचीसोबत आघाडी झाली होती ,या निवडणुकीत एकही जागा न लढविलेल्या पीआरपीला विधानसभेत मोक्याच्या जागा सोडण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. त्यानुसार विदर्भातील उमरेड,भंडारा,दर्यापूर,मुर्तीजा