लाचखोर अधिकाऱ्यांची छायाचित्रे आता फेसबुकवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लाचखोर अधिकाऱ्यांची छायाचित्रे आता फेसबुकवर

Share This
मुंबई - लाच घेताना पडकलेल्या अधिकाऱ्यांची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवरून प्रसिद्ध करण्याची योजना महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) आहे. एसीबीचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले, की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होत असलेली कारवाई जनतेपर्यंत पोचविण्यासाठी विभागाकडून फेसबुकवर पेज सुरू करण्याची योजना आहे. लाचखोर अधिकारी जनतेपर्यंत पोचविण्याचा मानस आहे. आठवड्यातून एक छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध करण्याची योजना आहे. या पेजवर छायाचित्रासह लाच घेतल्याची रक्कम, इतर कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 

यावर्षी एसीबीकडून 744 ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये आतापर्यंत 1009 अधिकाऱ्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या प्रमाणात 114 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी एसीबीकडून 348 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यात 452 जणांना अटक करण्यात आली होती. एसीबीकडून गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या संकेतस्थळावर लाचखोर अधिकाऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages