अनुसूचित जातीतील महिलेसाठी मुंबईचे महापौर पद राखीव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनुसूचित जातीतील महिलेसाठी मुंबईचे महापौर पद राखीव

Share This
मुंबई- राज्यातील महापालिकांच्या महापौरपदांचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. मुंबई महापौरपदी अनुसूचित जातीतील महिला विराजमान होणार असून, ठाणे व पुणे महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. नवी मुंबईत अनुसूचित जाती, मिरा-भाईंदरमध्ये सर्वसाधारण महिला, उल्हासनगरात ओबीसी महिला, कल्याण-डोंबिवलीत सर्वसाधारण प्रवर्ग, मिरा-भाईंदर व वसई-विरारमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी महापौरपद आरक्षित झाले आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये अनुसूचित जमाती, कोल्हापूरसाठी ओबीसी महिला, नाशिक व नागपूरमध्ये ओबीसी व सोलापूरला अनुसूचित जातीतील महिलेसाठी महापौरपद आरक्षित आहे. राज्यात 26 महापालिका असून, महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. प्रत्येक महापालिका आणि महापौरपदाच्या मुदतीचा कालावधी भिन्न असल्याने सध्याच्या महापौरांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर नवीन आरक्षण लागू होईल. उदाहरणार्थ मुंबईच्या महापौरांची मुदत याच महिन्यात संपत असल्याने तिथे तातडीने अनुसूचित जातीतील महिला उमेदवार विराजमान होईल. महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत शनिवारी मंत्रालयात काढण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages