साध्वीवर होती जोशीची वाईट नजर - जोशी याच्या हत्येमागे प्रमुख कारण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

साध्वीवर होती जोशीची वाईट नजर - जोशी याच्या हत्येमागे प्रमुख कारण

Share This
sadhvipragnya
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक सुनील जोशी याची वाईट नजर होती आणि जोशी याच्या हत्येमागे ते एक प्रमुख कारण होते, अशी खळबळजनक बाब एनआयएच्या तपासातून पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे. 

२००७ मध्ये झालेल्या सुनील जोशीच्या हत्येप्रकरणी मध्य प्रदेशमधील देवास पोलिसांनी आधीच साध्वी प्रज्ञा हिच्यावर आरोप ठेवलेले आहेत. आता एनआयए या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार असून साध्वीचे नाव पोलीस आणि एनआयए अशा दोन्ही तपास यंत्रणांच्या आरोपपत्रात असणार आहे.

'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, जोशीची वाईट नजर साध्वीवर पडली होती. तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. शिवाय अजमेर बॉम्बस्फोटाबाबत जोशी सर्व माहिती उघड करेल, अशी भीती साध्वीला होती. त्यातूनच जोशीची हत्या घडवून आणण्यात आली असावी, असा एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

२९ डिसेंबर २००७ रोजी सुनील जोशी याची हत्या करण्यात आली होती. राजेंद्र आणि लोकेश या दोन आरोपींनी ही हत्या केली होती. हे दोघे आणखीही कटात सामिल होते. मुस्लिमांवर आणखी हल्ले करण्याची योजना ते आखत होते, असेही एनआयएच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages