मुंबई,दि.१३,प्रतिनिधीः महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर व्हावे यासाठी आवष्यक असणाऱ्या पर्यावरण खात्याच्या परवानग्या तात्काळ मिळाव्या अशी मागणी शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी एका निवेदनाव्दारे केद्रीय पर्यावरणमंत्री श्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली. या स्मारकासाठी मुंबई येथील इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय संसदेने घेतला होता तरी त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरु व्हावी अशी मागणी करीत शेवाळे यांनी नव्या सरकारचे या मुद्याकडे लक्ष वेधले.
५ डिसेंबर २०१२ रोजी, तत्कालीन केंद्रीयमंत्री आनंद शर्मा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जागा राज्यसरकारला हस्तांतरीत करण्याची घोषणा लोकसभेत केली होती.काही तांत्रिक बाबींमध्ये पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आवष्यक असल्याने हा प्रस्ताव कागदावरच राहीला आहे.यापुर्वी केंद्रातील कॉग्रेस सरकारने याकडे लक्ष दिले नाही.आता केंद्रात एन डि ए.चे सरकार असल्यामुळे आंबेडकर अनुयायांच्या अपेक्षा उंचावल्या असुन पहिल्या अधीवेशनातच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी केली आहे.
भारताला सार्वभौम लोकशाही व धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता त्यांनी मोठ्या परिश्रमाने राज्यघटनेची निर्मिती केली. गेली ५६ वर्षे केंद्रातील सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आतरराष्ट्रीय स्मारकासाठी तज्ञ वास्तुविषारदांची मदत घेउन ताजमहालच्या दर्जाचे स्मारक बनवण्यात यावे आणि यावेळी संसदेच्या पहिल्या अधीवेशनातच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी केली आहे.
