मुंबई:कला संस्कृतीच्या प्रांतातील वैशिष्ट्यपूर्ण अशा कॅलिग्राफी कलेचं जतन,संवर्धन आणि प्रसार करणाऱ्या कॅलिफेस्टला वरळीतील कला दालन वप्रभादेवीतील रचना संसद येथे सुरूवात झाली. प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध फॅशनडिझायनर शायना एन.सी व नवनीत प्रकाशनचे अनिल गाला यांच्या हस्तेया उत्सवाचे उद्घाटन झाले.
‘अच्युत पालवांनी साकारलेली ही अक्षरांच्या दुनिया ही मनाला आगळा-वेगळा आनंद देऊन जाते. ही रूपं पाहून मनाला प्रसन्नता मिळते’, असेशायना ए.सी म्हणाल्या. ‘कॅलिग्राफी ही फक्त मुंबई-पुण्यापुरती मर्यादित नराहता तिला देशातील विविध भागांतील प्रतिनिधित्व मिळवून देण्याचेकाम आम्ही या महोत्सवाद्वारे करत आहोत असे, अच्युत पालव म्हणाले.
विद्यार्थी, अभ्यासक तसेच संशोधकांसाठी ‘कॅलिफेस्ट’च्या माध्यमातूनकॅलिग्राफी जाणून व अभ्यासून घेण्याची संधी मिळणार आहे. एका भाषेपुरतेमर्यादित न राहता कॅलिग्राफीची उर्दू, गुरूमुखी, देवनागरी, मल्याळम अशाभारताच्या चोहोदिशांकडील लिप्यांची रुपे या उत्सवात पहायला मिळतील.प्रदर्शन, तज्ज्ञांचे व्याख्यानरूपी मार्गदर्शन् तसेच प्रात्यक्षिके असे या कार्यक्रमाचेस्वरूप असेल. हे प्रदर्शन, व्याख्यान आणि प्रात्यक्षिके प्रभादेवी स्थित रचनासंसद येथे १३ ते १८ ऑगस्ट दरम्यान होतील. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, फॅशन,टेक्स्टाईल्स, सिरॅमिक, फर्निचर, इंटिरिअर्स अशा विविध विषय यानिमित्तानेचर्चिले जातील.
