अग्निशमन दल पोषाख खरेदी भ्रष्टाचार - पालिकेचे दुर्लक्ष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन दल पोषाख खरेदी भ्रष्टाचार - पालिकेचे दुर्लक्ष

Share This
मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांसाठी 2010 मध्ये घेण्यात आलेल्या अत्याधुनिक पोषाखांच्या खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले होते. तरीही महानगरपालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे उपाध्यक्ष पी. के. जैन यांनी केला असून या प्रकरणी पालिका आयुक्तांची भेट घेतली असता चौकशी करण्याचे आश्‍वासन आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. 

महानगरपालिकेने अग्निशमन दलाच्या जवानांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आगप्रतिबंधक पोषाख खरेदी केले. परंतू प्रत्यक्षात बाजारभावापेक्षा जास्त दराने घेतलेले हे पोषाख अत्यंत निकृष्ट दर्जाचे निघाले. याविषयी तक्रारी आल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला 2013 मध्ये पाठवला होता. मात्र, त्यावर महापालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत पालिका आयुक्तांना जुलैमध्ये पत्र पाठवले होते. त्याचे साधे उत्तरही दिलेले नाही, अशी माहिती जैन यांनी दिली.

कुलाबा येथील "दाणी सदन‘ या इमारतीला "ना-हरकत‘ प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी एका अग्निशमन अधिकाऱ्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्यावरही अद्याप कारवाई झालेली नाही, असे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणले असता आयुक्त कुंटे यांनी विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे जैन यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages