मुंबई : जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी आरपीआय (आरके) चे अध्यक्ष राजाराम खरात यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथिल पत्रकार परिषदेत केली .
लहाने यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप जेजे मधील कर्मचारी नरेश वाघेला यांनी सहा महिन्यांपूर्वी केला होता. या बाबत त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. याबाबतचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. तेथील ओपीडी मध्ये लहानेना मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु डॉ. लहाने अद्यापही अधिष्ठाता या पदावर कार्यरत असल्याने चौकशीस साक्षीदारावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव येऊ शकतो. प्रत्येक तीन वर्षांनी अधिष्टतांची बदली होते. मात्र डॉ. लहाने यांचा कार्यकाळ चार वर्षे व अधिक झाला आहे. तरीही त्यांची बदली करण्यात आलेली नाही. वाघेला यांनी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पोलिसात तक्रार दाखल केली असल्याने या प्रकरणाची निरपेक्षपणे चौकशी व्हावी यासाठी लहाने यांची बदली करावी असे खरात यावेळी म्हणाले. या प्रकरणी वैद्यकीय मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेणार असल्याचे खरात यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment