शहराचा नगरविकास आराखडा एप्रिल २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शहराचा नगरविकास आराखडा एप्रिल २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय

Share This
मुंबई - मुंबई पालिका २०१४ ते ३४ या २० वर्षांसाठी नगरविकास आराखडा बनवत आहे; मात्र हा आराखडा पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. लोकसभेपाठोपाठ लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे आराखड्याचे काम लांबणीवर पडत असल्यामुळे महापालिका वर्षभराची वाढीव मुदत राज्य सरकारकडे मागणार आहे. पालिकेने हा आराखडा एप्रिल २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहराचा विकास आराखडा बनविण्यासाठी ४ ऑक्‍टोबर २०१३ पर्यंतची मुदत राज्य सरकारने पालिकेला दिली होती; पण या मुदतीत आराखडा अंतिम होत नसल्याने पालिकने सहा महिन्यांकरिता मुदत वाढवून घेतली होती. त्यानंतर सरकारने ४ एप्रिल २०१४ पर्यंत या आराखड्याला अंतिम रूप देण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते; मात्र त्या वेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी असल्याने भूवापर सर्वेक्षणाबाबतची कार्यशाळा पालिकेला घेता आली नाही. सध्या ही कार्यशाळा सुरू आहे; पण आचारसंहितेमुळे बराच कालावधी वाया गेला आहे आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी होणार आहे. त्यामुळे पुन्हा वर्षभराची मुदतवाढ देण्याची मागणी पालिका प्रशासन राज्य सरकारकडे करणार आहे. 
नियोजन  - सध्या भूवापर आराखड्याबाबतची विभागस्तरीय कार्यशाळा सुरू आहे. ही कार्यशाळा सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.
- प्रारूप विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावलीवरील अहवाल नाव्हेंबर-डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार.
- जानेवारी २०१५ मध्ये हा प्रारूप आराखडा सुधार समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार.
- फ्रेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये प्रारूप आराखडा व विकास नियोजन नियमावली महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.
- एप्रिल २०१५ मध्ये प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages